नांदगावात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेचा विष प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न
नांदगांव, 17 जून (हिं.स.)। कोणतेही कारण नसताना आणि कोणतीही चूक नसताना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ नांदगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शिवकन्या सौ. संगिता सोनवणे या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने शिक्षण विभागाच्या कारभाराच
A stir in Nandgaon! A


नांदगांव, 17 जून (हिं.स.)। कोणतेही कारण नसताना आणि कोणतीही चूक नसताना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ नांदगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शिवकन्या सौ. संगिता सोनवणे या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेने शिक्षण विभागाच्या कारभाराचा निषेध करत विष प्राशन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण नांदगाव तालुक्यात आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नांदगाव नगरपालिकेच्या मालकीच्या शाळेत शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या महिलांना अचानक कामावरून कमी करण्यात आले होते. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि कारणाशिवाय ही कारवाई केल्यामुळे संबंधित महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप होता. या राजकीय दबावाखालील अन्यायाविरोधात सौ. संगिता सोनवणे यांनी प्रशासनाला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज सर्व बाधित महिला कर्मचारी नांदगाव येथील शिवस्फूर्ती मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमल्या होत्या. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या महिलांना न्याय देण्याऐवजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत निर्लज्जपणाची आणि बेजबाबदारपणाची भूमिका घेतली. आमच्या हातात काही नाही, आम्ही आता चौकशी समिती नेमू आणि मग काय तो निर्णय घेऊ, अशी उडवाउडवीची उत्तरे गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.याचा संताप अनावर झाल्याने संगिता सोनवणे या महिलेने विष प्राशन केले त्यांना तात्काळ नांदगांव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र प्रकृती खालवल्याने त्यांना तात्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असुन 24 तास त्यांना देखरेखीखाली ठेवले आहे

संगिता सोनवणे यांचे प्रकृती चिंताजनक

अधिकाऱ्यांच्या या उदासीन आणि नकारात्मक उत्तरामुळे संतापलेल्या संगिता सोनवणे यांनी अखेर प्रशासनाचा निषेध करत विष प्राशन केले. ऐनवेळी घटनास्थळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उपस्थित महिला कर्मचारी आणि पोलिसांनी तात्काळ तत्परता दाखवली. सोनवणे यांना पोलिसांच्या गाडीत टाकून तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

व्हीआयपींना पत्र देऊनही दुर्लक्ष; महिलांचा संताप

आंदोलक महिलांनी आरोप केला आहे की, प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा केवळ आमची थट्टा करत आहे. या अन्यायाविरोधात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ विभागांना लेखी पत्रे दिली होती. परंतु, या बड्या नेत्यांनी आणि प्रशासनाने आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या याच हलगर्जीपणामुळे आज एका महिलेला टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा संतप्त आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.या घटनेनंतर नांदगावमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande