परभणी - शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे 19 व 20 जून रोजी आयोजन
परभणी, 17 जून (हिं.स.)। मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र. द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन दि. 19 व 20 जून 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थ
परभणी - शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे 19 व 20 जून रोजी आयोजन


परभणी, 17 जून (हिं.स.)। मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र. द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन दि. 19 व 20 जून 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे केले आहे.

या मेळाव्यामध्ये दि. 19 जून 2026 रोजी टाटा स्ट्राईव्ह व बीएमएसतर्फे एन्ड्युरन्स कंपनी, छत्रपती संभाजीनगर व दि. 20 जून रोजी आर्म्स प्लेसमेंट तर्फे व्हेरॉक व ड्युरो व्हॉल्व कंपनी, छत्रपती संभाजीनगर करीता शिकाऊ उमेदवारी भरती केली जाणार आहे. आस्थापनामध्ये भरती केलेल्या शिकाऊ उमेदवारांना रु.१०,००० ते १५,०००/- विदयावेतन दिले जाणार आहे, तरी जिल्हयातील आय.टी. आय उतीर्ण झालेले व शेवटच्या वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी तसेच इतर पात्र उमेदवारांनी मेळाव्यात हजर राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार विकास आडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande