सोलापूर - निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सोलापूर, 17 जून (हिं.स.)। विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी तसेच कायदा
Collctor


सोलापूर, 17 जून (हिं.स.)। विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी हा आदेश जारी केला आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

यानुसार सोलापूर महानगरपालिका, कुर्डूवाडी, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज नगरपरिषद हद्दीतील सर्व मद्यविक्री दुकाने, बार, क्लब तसेच संबंधित अनुज्ञप्तीधारक आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सोलापूर महानगरपालिका हद्दीतील संबंधित आस्थापना २२ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहतील.

या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम ५४ व ५६ नुसार संबंधित परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande