इंडियाफर्स्ट लाईफच्या एक शाम पापा के नाम मोहिमेतून वडिलांना व्यक्ती म्हणून समजून घेण्याचे आवाहन
मुंबई, १७ जून (हिं.स.) : इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (इंडियाफर्स्ट लाईफ) फादर्स डेच्या निमित्ताने एक शाम पापा के नाम ही हृदयस्पर्शी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम मुलांना काही काळ थांबून वडिलांकडे केवळ कुटुंबाचा गाडा हाकणारी व्यक्त

इंडियाफर्स्ट लाईफ


मुंबई, १७ जून (हिं.स.) : इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (इंडियाफर्स्ट लाईफ) फादर्स डेच्या निमित्ताने एक शाम पापा के नाम ही हृदयस्पर्शी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम मुलांना काही काळ थांबून वडिलांकडे केवळ कुटुंबाचा गाडा हाकणारी व्यक्ती म्हणून न पाहता त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पुन्हा नव्याने समजून घेण्याचे आवाहन करते.

द वोम्‍बद्वारे संकल्पित आणि गुड मॉर्निंग फिल्म्स निर्मित एक शाम पापा के नाम ही मोहीम शुजात सौदागर दिग्दर्शित आणि अभिनेता अविनाश तिवारी यांच्या सशक्त अभिनयाने सजलेल्या एका संवेदनशील जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे. पिढ्यानपिढ्या वडिलांनी आपले प्रेम नेहमी जबाबदारीच्या माध्यमातून व्यक्त केले आहे, जसे कुटुंबाचे रक्षण करणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि नेहमी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणे. पण, ही सर्व जबाबदारी पार पाडत असताना त्यांची स्वतःची स्वप्ने, त्यांच्या गोष्टी, त्यांची भीती आणि त्यांच्या भावना अनेकदा अनपेक्षितपणे मनाच्या कोपऱ्यातच राहून जातात. एक शाम पापा के नाम मोहीम याच शांत आणि न बोलल्या जाणाऱ्या अंतरावर प्रकाश टाकते आणि मुलांना त्यांच्या वडिलांमधील एक माणूस खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करते.

इंडियाफर्स्ट लाईफचे ब्रँड वचन ‘जिम्मेदारियाँ हमसे बांटिये, हल्का लगेगा' यावर आधारित ही मोहीम कुटुंबाचा भार वाहणाऱ्या वडिलांचे ओझे हलके करण्याच्या प्रवासातील ब्रँडचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. वडिलांना नेहमी अग्रस्थान देणारा ब्रँड इंडियाफर्स्ट लाईफ मुलांना त्यांच्या वडिलांना स्वतःच्या गोष्टी आणि अनुभव शेअर करण्यासाठी हक्काची जागा देऊन, त्यांचे मन थोडे हलके करत ‘पप्पांना प्रथम स्थान' देण्यासाठी प्रोत्साहित करते.

इंडियाफर्स्ट लाईफचे चीफ मार्केटिंग ऑफिसर सुभंकर सेनगुप्‍ता म्हणाले, “इंडियाफर्स्ट लाईफमध्ये आमचा विश्वास आहे की, सुरक्षा ही केवळ आर्थिक संरक्षणापुरती मर्यादित नसते, तर आपण जपणारे नातेसंबंध किती घट्ट आहेत यावरही अवलंबून असते. वडील हे बहुधा आपल्या आयुष्यातील मूक आधारस्तंभ असतात. ते कुटुंबासाठी काय करतात यावरून त्यांना पाहिले जाते, ते प्रत्यक्षात एक व्यक्ती म्हणून कोण आहेत याकडे लक्ष दिले जात नाही. आणि काळाच्या ओघात, हीच त्यांची ओळख बनून जाते. ‘एक शाम पापा के नाम’ या प्रभावी कथेच्या माध्यमातून आम्हाला कुटुंबांना काही काळ थांबून एकमेकांशी पुन्हा जोडले जाण्यासाठी आणि आपल्या वडिलांना प्रथम स्थान देण्यास (#FathersFirst) प्रेरित करायचे आहे, ज्‍यामुळे त्यांना हलके वाटेल. कारण कधी-कधी आपण गमावलेले छोटे क्षण अशा गोष्टी बनतात, ज्या आपल्याला पुन्हा कधीच ऐकायला मिळत नाहीत.”

द वोम्‍बचे सीनियर क्रिएटिव्ह पार्टनर गुंजन गाबा म्हणाल्या, फादर्स डेच्या निमित्ताने अनेक ब्रँड्स वडिलांचे गुणगान गाण्याबद्दल बोलतात, पण त्यातील बरेचसे संदेश अंधारातील जहाजांप्रमाणे नकळत निघून जातात. कुटुंबाचा मुख्य आर्थिक भार वाहणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहणारा ब्रँड म्हणून आम्ही एका साध्या निरीक्षणापासून सुरुवात केली: आपल्यापैकी बरेच जण आपल्या वडिलांना केवळ वडील म्हणून ओळखतात. ते सहसा घरातून सर्वात आधी बाहेर पडणारे आणि शेवटी परतणारे व्यक्ती असतात, जे ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात त्यांच्यासाठी स्वतःची वैयक्तिक ओळख बाजूला ठेवून संपूर्ण आयुष्य कुटुंबाच्या गरजा पुरवण्यात घालवतात. आम्ही हे एका पश्चात्तापाच्या कथेच्या माध्यमातून मांडण्याचे ठरवले. कारण एका व्यक्तीचा पश्चात्ताप अनेकांसाठी एक आठवण किंवा धडा बनू शकतो: खूप उशीर होण्यापूर्वीच पाऊल उचला.”

गुड मॉर्निंग फिल्म्सचे फिल्‍म डायरेक्‍टर शुजात सौदागर म्हणाले, “आठवणींचे रूपांतर प्रश्नांमध्ये होण्याची वाट पाहू नका. ज्या व्यक्तीला आपण वडील म्हणतो, त्याला जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याचा हा पश्चात्ताप माझ्या मनाला स्पर्श करून गेला. आमचा प्रयत्‍न अशी कथा निर्माण करण्याचा होता, जी भावनिकदृष्ट्या अतिशय प्रभावी आणि प्रत्‍यक्ष मनाला भिडणारी असेल. द वोम्‍ब आणि इंडियाफर्स्ट लाईफच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. तसेच, अभिनेता अविनाश तिवारीसोबत पुन्हा एकदा काम करण्याचा आनंद मिळाला, ज्याने या जाहिरातीमध्‍ये आपल्या उत्तम अभिनयाद्वारे या कथेचा भावनिक गाभा अतिशय सुंदरपणे पडद्यावर जिवंत केला आहे.”

ही मोहीम फादर्स डेच्या दरम्यान डिजिटल प्लॅटफॉर्म्स, सोशल मीडिया आणि इतर एकात्मिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर राबवली जाईल.

मोहीम (कॅम्पेन) येथे पहा: https://youtu.be/9fVdZSzmSTU

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande