विरोधक घरी झोपतात म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली - जयकुमार गोरे
सोलापूर, 17 जून (हिं.स.) सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत हे पक्षाकडे असलेल्या मतांपेक्षा सुमारे २०० अधिक मते मिळवून विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. व्हीप बजावणे ही पक्षाची नियमित आणि सर्व
Jaykumar gore newss


सोलापूर, 17 जून (हिं.स.) सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत हे पक्षाकडे असलेल्या मतांपेक्षा सुमारे २०० अधिक मते मिळवून विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. व्हीप बजावणे ही पक्षाची नियमित आणि सर्वसाधारण प्रक्रिया असून भाजप कोणालाही घाबरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सोलापूर आणि सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकांबाबत भाष्य केले. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदार असलेल्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींसाठी भाजपने व्हीप जारी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजपच्या ३१६ मतदार सदस्यांना भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या स्वाक्षरीने व्हीप देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी विरोधकांवर टीका करताना, विरोधक घरी झोपतात, त्यामुळे त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथील भीषण अपघातावरही त्यांनी भाष्य केले. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला असला, तरी संबंधित विहिरीभोवती संरक्षण कठडा असता तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे त्यांनी सांगितले.महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला यापूर्वी अनेक नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या विहिरींची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आवश्यकतेनुसार काही विहिरींना संरक्षक कठडे बांधले जातील तर काही विहिरी बुजविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande