जेराई फिटनेस लिमिटेडतर्फे 'लास्ट वन स्टँडिंग' स्पर्धेची घोषणा
मुंबई, १७ जून (हिं.स.) : भारतातील फिटनेस उपकरणांच्या स्वयंचलित उत्पादनातील अग्रणी कंपनी असलेल्या ''जेराई फिटनेस लिमिटेड''ने ''लास्ट वन स्टँडिंग'' (Last One Standing) या त्यांच्या प्रकारातील पहिल्या राष्ट्रीय ''स्ट्रेंथ अँड एंड्युरन्स'' (श
लास्ट वन स्टँडिंग


मुंबई, १७ जून (हिं.स.) : भारतातील फिटनेस उपकरणांच्या स्वयंचलित उत्पादनातील अग्रणी कंपनी असलेल्या 'जेराई फिटनेस लिमिटेड'ने 'लास्ट वन स्टँडिंग' (Last One Standing) या त्यांच्या प्रकारातील पहिल्या राष्ट्रीय 'स्ट्रेंथ अँड एंड्युरन्स' (शारीरिक ताकद आणि सहनशक्ती) स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी 'रीबॉक' हे मर्चेंडाइज आणि फिटनेस ॲक्सेसरीज भागीदार (पार्टनर) असतील.

केवळ एक फिटनेस स्पर्धा न राहता, हा कार्यक्रम एक व्यापक चळवळ म्हणून पाहिला जात आहे; जी देशभरातील फिटनेस प्रेमी, खेळाडू, जिममध्ये जाणारे लोक आणि स्वतःला आव्हान देणाऱ्या सामान्य नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणेल. जेराई फिटनेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि या कार्यक्रमाचे क्युरेटर राजेश राय यांनी स्पर्धेची घोषणा केली. यावेळी माजी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटू आणि एमएमए (MMA) फायटर रितू फोगट, प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर व अभिनेता मुस्तफा (धुरंदर फेम), 'इंडियाज अल्टिमेट वॉरियर'चा विजेता दिनेश शेट्टी आणि सेलिब्रिटी बॉडीगार्ड शेरा आदी मान्यवर उपस्थित होते.

याच कार्यक्रमात रितू फोगट यांची या स्पर्धेची 'ब्रँड ॲम्बेसेडर' आणि जेराई फिटनेसची 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हणून घोषणा करण्यात आली. या एकदिवसीय चॅम्पियनशिपसाठी www.lastonestanding.in या संकेतस्थळावर नोंदणी सुरू झाली असून, तिची पहिली आवृत्ती १३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबईतील नेस्को, गोरेगाव (पूर्व) येथे आयोजित केली जाणार आहे. पहिल्या आवृत्तीसाठी सहभाग केवळ पहिल्या ५०० स्पर्धकांपुरता मर्यादित असेल आणि यात एकूण २१ लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.

येत्या काळात, 'लास्ट वन स्टँडिंग' ही स्पर्धा देशातील सर्व प्रमुख महानगरांमध्ये आयोजित केली जाईल. तसेच लहान वयातच मुलांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावरही भरवली केली जाईल. लोकांमध्ये शारीरिक ताकद, सहनशक्ती, शिस्त आणि जिद्द या गुणांशी पुन्हा नाते जोडण्याची प्रेरणा देणे, हा 'लास्ट वन स्टँडिंग'चा मुख्य उद्देश आहे. फिटनेस म्हणजे केवळ बाह्य रूप किंवा शरीरयष्टी नव्हे, या विचारावर आधारित ही चॅम्पियनशिप स्पर्धकांना त्यांचे शरीर आणि मन खरोखर किती क्षमता गाठू शकते, हे शोधण्याचे आव्हान देते. केवळ एका विशिष्ट क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पारंपरिक स्पर्धांच्या विपरीत, 'लास्ट वन स्टँडिंग'मध्ये अनेक फिटनेस आव्हानांचा समावेश करून एकूण कामगिरीची (ओव्हरऑल परफॉर्मन्स) एक अत्यंत कठीण अशी एकत्रित चाचणी घेतली जाते.

या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू स्क्वॉट्स (Squats), बेंच प्रेस (Bench Press), डेडलिफ्ट (Deadlift), पुल-अप्स (Pull-Ups), जायंट बॅट रन (Giant Bat Run) आणि एअर बाईक (सायकलिंग) अशा सहा विविध प्रकारांमध्ये (इव्हेंट्समध्ये) आपली कौशल्ये आजमावतील. प्रत्येक प्रकाराची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की, त्याद्वारे शारीरिक तंदुरुस्तीच्या विविध पैलूंची - जसे की शारीरिक ताकद आणि सहनशक्तीपासून ते चपळता, समतोल आणि मानसिक कणखरपणापर्यंत - चाचणी घेतली जाईल. ही स्पर्धा तिच्या सर्वसमावेशक स्वरूपामुळेही वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

ही स्पर्धा १८ वर्षांवरील पुरुष आणि महिलांसाठी खुली असून, यात वयोगट आणि वजनानुसार विविध गट करण्यात आले आहेत. पुरुषांच्या विभागात ३० वर्षांखालील आणि ३० वर्षांवरील असे गट असतील, तर महिलांच्या विभागात २५ वर्षांखालील आणि २५ वर्षांवरील गटांचा समावेश असेल. सहभागी खेळाडू सुरुवातीला गट फेऱ्यांमध्ये (group rounds) स्पर्धा करतील आणि सहाही प्रकारांमध्ये गुण मिळवतील. प्रत्येक गटात सर्वाधिक एकूण गुण मिळवणारा खेळाडू 'लास्ट वन स्टँडिंग' हा प्रतिष्ठित किताबाचा मानकरी ठरेल.

प्रत्येक प्रकारातील विजेत्याला रोख बक्षीस दिले जाईल, तर गटातील अंतिम विजेत्यांना भव्य बक्षिसे आणि विशेष सन्मान देऊन गौरवले जाईल. या स्पर्धेत एकूण चार 'ओव्हरऑल' (सर्वसाधारण) विजेते आणि सहा वैयक्तिक प्रकारांमधील गटांनुसार इतर विजेते घोषित केले जातील.

या स्पर्धेबद्दल आणि तिच्या आयोजनाबद्दल बोलताना 'जेराई फिटनेस'च व्यवस्थापकीय संचालक आणि 'लास्ट वन स्टँडिंग'चे संकल्पक राजेश राय म्हणाले, आजच्या काळात सोयी-सुविधांमुळे आपल्या जीवनातील शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. आपले शरीर प्रचंड ताकद निर्माण करण्यास सक्षम आहे, तरीही आपण त्याला फारसे आव्हान देत नाही. 'लास्ट वन स्टँडिंग' हा सहनशक्ती, शिस्त आणि जिद्द ही भावना पुन्हा जागृत करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. हे व्यासपीठ केवळ उच्च-स्तरीय खेळाडूंसाठीच नाही, तर ज्यांना स्वतःची क्षमता तपासायची आहे आणि आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन कामगिरी करायची आहे, अशा प्रत्येकासाठी आहे.

या स्पर्धेत देशभरातून सहभागी येण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेसोबतच, या कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी विशेष विभाग (crowd engagement zones), रिकव्हरी एरिया (विश्रांती व पुनर्प्राप्तीसाठी जागा), थेट अनुभव घेण्याची संधी आणि फिटनेस समुदायाचा सहभाग अशा गोष्टींचा समावेश असेल, ज्यामुळे एका उत्साही फिटनेस महोत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande