विधान परिषद निवडणुकीसाठी लातूर जिल्हा सज्ज; ४०६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
लातूर, 17 जून (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीसाठी लातूर जिल्हा सज्ज; ११ मतदान केंद्रांवर ४०६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर मतदाना
स्थानिक स्वराज्य संस्था


लातूर, 17 जून (हिं.स.)। विधान परिषद निवडणुकीसाठी लातूर जिल्हा सज्ज; ११ मतदान केंद्रांवर ४०६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

: उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील एकूण ४०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील केज, रेणापूर, अहमदपूर, जळकोट, चाकूर, लातूर, उदगीर, शिरूर अनंतपाळ, देवणी, औसा आणि निलंगा या ठिकाणी मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. बहुतांश मतदान केंद्रे संबंधित तहसील कार्यालयांमध्ये उभारण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांसाठी स्वतंत्र मतदान व्यवस्था करण्यात आली आहे.

या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगर परिषद सदस्य आणि नगर पंचायत सदस्य असे स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मतदार म्हणून मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान साहित्य, कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था आणि मूलभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मतदारसंख्येच्या दृष्टीने लातूर मतदान केंद्र सर्वात मोठे असून येथे जिल्हा परिषद व महानगरपालिका मिळून एकूण ८८ मतदार आहेत. उदगीर येथे ५३, निलंगा येथे ३७, औसा येथे ३६, अहमदपूर, रेणापूर आणि चाकूर येथे प्रत्येकी ३५, जळकोट येथे २३, देवणी येथे २३, शिरूर अनंतपाळ येथे २२ तर केज येथे १९ मतदार मतदान करणार आहेत.

मतदान केंद्रांपैकी काही केंद्रांपासून सर्वात दूर असलेली गावे ३० ते ३७ किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. निलंगा मतदान केंद्रासाठी सर्वाधिक ३७ किलोमीटर अंतरावरील गावाचा समावेश आहे, तर उदगीरसाठी हे अंतर ३४ किलोमीटर आहे.

मतदान केंद्रनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे :

मतदान केंद्र मतदार संख्या

केज १९

रेणापूर २५

अहमदपूर ३५

जळकोट २३

चाकूर २५

लातूर ८८

उदगीर ५३

शिरूर अनंतपाळ २२

देवणी २३

औसा ३६

निलंगा ३७

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून मतदान केंद्र परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande