नांदेड विधान परिषद निवडणूक : महायुतीचा मतदार प्रशिक्षण वर्ग व महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
नांदेड, 17 जून (हिं.स.) : नांदेड विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आणि नगरसेवकांची मतदार प्रशिक्षण कार्यशाळा तसेच महत्त्वपूर्ण बैठक आज यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत मतदान प्रक्रियेबाबत उ
Q


नांदेड, 17 जून (हिं.स.) : नांदेड विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आणि नगरसेवकांची मतदार प्रशिक्षण कार्यशाळा तसेच महत्त्वपूर्ण बैठक आज यशस्वीरीत्या पार पडली.

या बैठकीत मतदान प्रक्रियेबाबत उपस्थित मतदारांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथजी राजूरकर यांना अनुक्रमांक १ वरील पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. चैतन्य बापू देशमुख तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.बैठकीत आगामी निवडणूक रणनीती, मतदान प्रक्रिया आणि संघटनात्मक तयारी यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande