
निफाड, 17 जून (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिंडोरी लोकसभा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर दिलीप खैरे यांनी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान आमदार बनकर यांनी दिलीप खैरे यांचे अभिनंदन करून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यशस्वी कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
दिलीप खैरे यांनीही आमदार बनकर यांचे मार्गदर्शन घेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आगामी काळात पक्षाची भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावीपणे केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते विश्वासराव मोरे, बाळासाहेब बनकर, रामभाऊ माळोदे, सुरेशदादा खोडे, शहराध्यक्ष राजेंद्र खोडे, डॉ. योगेश गोसावी, पप्पू गायकवाड, श्रीकांत वाघ, अमोल बनकर, सुशांत गोसावी, अजय चोरडिया यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भेटीदरम्यान पक्ष संघटना, आगामी राजकीय घडामोडी तसेच नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील विविध विकासविषयक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV