
छत्रपती संभाजीनगर, 17 जून (हिं.स.)।
केंद्रीय राज्यमंत्री (ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण) निमुबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दौरा असताना त्यांनी जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला भेट दिली.
लेणी परिसरातील गाईडमार्फत युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या या जगप्रसिद्ध स्थळाची माहिती, इतिहास, सौंदर्य याची इत्यंभूत माहिती घेतली. यावेळी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis