परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना
परभणी, 17 जून (हिं.स.)। विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होत असून, मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्य घेऊन आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले.यावेळी जिल्हाधिका
परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना


परभणी, 17 जून (हिं.स.)।

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होत असून, मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्य घेऊन आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले.यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मतदान पथकांच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्य, मनुष्यबळ व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande