पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेत अभिवादन
सोलापूर, 17 जून (हिं.स.)। पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुण्यश्लोक आप्प
[iou


सोलापूर, 17 जून (हिं.स.)।

पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी ताई तडवळकर, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भास्कर सामलेटी, सिद्धू तिमिगार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या सामाजिक आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande