रत्नागिरी : दीपक पटवर्धन यांचे रविंद्र चव्हाण, डावखरेंकडून अभिनंदन
रत्नागिरी, 17 जून (हिं.स.) । भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांनी स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट देऊन राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनं
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत स्वागत करताना अॅड दीपक पटवर्धन


आमदार निरंजन डावखरे यांचे स्वागत करताना दीपक पटवर्धन


रत्नागिरी, 17 जून (हिं.स.) । भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांनी स्वरूपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट देऊन राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले.

चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यावेळी अग्रक्रमाने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला भेट दिली. आपल्यावर आलेली ही नवीन जबाबदारी पार पाडताना पक्षही आपल्या पाठीशी राहील. कोकणात पहिल्यांदाच आलेल्या या पदाचा ठसा पतसंस्था चळवळीवर उमटेल असे प्रभावी काम करा, असे सांगत या विजयाबद्दल त्यांनी ॲड. पटवर्धन यांचे अभिनंदन केले.

चव्हाण यांच्यासह प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार प्रशांत ठाकूर, डॉ. विनय नातू व जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव हेही स्वरूपानंद पतसंस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भाजपाच्या तिन्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आज संस्थेला भेट देऊन ॲड. पटवर्धन यांच्याशी चर्चा केली. हा विषय राजकीय वर्तुळात कुतूहलमिश्रित चर्चेचा विषय ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande