परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू.
परभणी, 17 जून (हिं.स.)। परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी दि. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान तहसील कार्यालय परभणी, तहसील कार्यालय सेलू, उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड आणि तहसील कार्यालय पाथरी येथे मतदान होणार आहे. मत
परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू.


परभणी, 17 जून (हिं.स.)।

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी दि. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान तहसील कार्यालय परभणी, तहसील कार्यालय सेलू, उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड आणि तहसील कार्यालय पाथरी येथे मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.या आदेशानुसार मतदान केंद्रांच्या ठिकाणांपासून १०० मीटर परिसराच्या आतील सर्व पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे मंडप, दुकाने, फेरीवाले, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने तसेच पक्ष किंवा उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि. १७ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत, असे जिल्हादंडाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande