सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
पुणे, 17 जून (हिं.स.)। स्वातंत्र्य, स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे अजरामर प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित कार्यक्रमात कु
fgdf


पुणे, 17 जून (हिं.स.)। स्वातंत्र्य, स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे अजरामर प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मेवाडच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या आणि कोणत्याही परकीय सत्तेसमोर मान न झुकविणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या अद्वितीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि मातृभूमीप्रती असलेली त्यांची अढळ निष्ठा ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. तसेच महाराणा प्रताप यांच्या जीवनातील संघर्ष, नेतृत्वगुण आणि स्वातंत्र्यरक्षणासाठी केलेल्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य शंतनू लामदाडे, मोहिते, कृष्णाजी भंडलकर, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रा. डॉ. सदानंद बनसोडे, प्रा. डॉ. रावसाहेब लटपटे, प्रा. डॉ. धनंजय मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande