
रत्नागिरी, 17 जून (हिं.स.) । : रेल्वे पोलीस ठाण्यातर्फे आज (दि. १७ जून) रत्नागिरी रेल्वे स्थानकात जीवन रक्षा अभियान राबविण्यात आले.
सकाळी ९ ते ११ या वेळेत राबविण्यात आलेल्या या अभियानादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन सहभाग घेतला. त्यांनी संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले व अभियानास शुभेच्छा दिल्या.
मुंबई रेल्वे आयुक्तालयांअंतर्गत गेल्या काही वर्षांत मुंबई रेल्वे प्रवासादरम्यान अनेक रेल्वे प्रवासी रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग करताना, घाईघाईत गाडीत चढणे किंवा उतरत असताना रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. अनेक प्रवासी जखमी होऊन कायमचे अपंग होतात. अशा बऱ्याच घटना घडतात. त्याअनुषंगाने लोहमार्ग (मुंबई) पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयात जीवन रक्षा अभियान हाती घेण्यात आले. आज ते रत्नागिरी रेल्वे स्थानकात राबविण्यात आले.
यावेळी रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण पाडवी, उपनिरीक्षक रविकुमार पाटील, डब्ल्यूपीएसआय आश्विनी धापसे, संगीता लोंढे, स्टेशन अधीक्षक श्री. कोवे, रेल्वे सुरक्षा बलचे प्रभारी निरीक्षक सतीश विधाते, कमर्शियल अधिकारी श्रीमती शुभदा देसाई, तसेच अंमलदार व होमगार्ड जवान उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी