
सोलापूर, 17 जून (हिं.स.)।सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी शासन पातळीवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी दिली.
नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाल्यानंतर सोलापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योग, व्यापार आणि प्रवासी वाहतुकीसह जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला वेग मिळणार आहे.
सोलापूरकरांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही महत्त्वाची मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाईट लँडिंगचा विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जातील, असे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड