
पुणे, 17 जून (हिं.स.)।
पोस्टमास्तर जनरल कार्यालयाच्यावतीने टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पोस्टमास्तर जनरल कार्यालय, पुणे क्षेत्र येथे होणार आहे.
टपाल विभागातून निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाशी संबंधित तक्रारींचा या अदालतमध्ये विचार केला जाणार आहे. विशेषतः, पुणे क्षेत्रातील अशा प्रकरणांचा समावेश होईल ज्यांचे तीन महिन्यांच्या आत निपटारा झालेला नाही. तथापि, उत्तराधिकार, धोरणात्मक बाबी किंवा नितीशी संबंधित प्रकरणांवर या पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.
इच्छुक निवृत्तिवेतनधारकांनी आपले अर्ज निर्धारित नमुन्यात ३ जुलै २०२६ पूर्वी खालील पत्त्यावर पाठवावेत. वरिष्ठ लेखा अधिकारी, पोस्टमास्तर जनरलचे कार्यालय, पुणे क्षेत्र, ४ फायनान्स रोड, पुणे जी.पी.ओ. जवळ, साधुवासवानी चौक, पुणे- ४११००१ अर्जांचा पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु