अमरावती विधान परिषद निवडणुकीत 94.68 टक्के मतदान
अमरावती, 18 जून (हिं.स.)। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात 451 पैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 94.68 टक्के मतदान नोंदविण्यात आले. सात मतदान केंद्रांपै
अमरावती विधान परिषद निवडणुकीत 94.68 टक्के मतदान


अमरावती, 18 जून (हिं.स.)।

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात 451 पैकी 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 94.68 टक्के मतदान नोंदविण्यात आले. सात मतदान केंद्रांपैकी धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वे या चार केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले, तर तिवसा-भातकुली केंद्रावर सर्वात कमी 68.42 टक्के मतदान झाले.या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र अमरावती महानगरपालिकेतील काँग्रेसचे सहा नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस समर्थक एक नगरसेवक अशा एकूण सात जणांनी पक्षाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून मतदान केल्याने ते बंडखोर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. धीरज हिवसे, विक्की वानखेडे, लुबना तनवीर, जयश्री जठाळे, प्रशांत महल्ले, अफसर शाह तसेच समर्थक नगरसेवक भल्ला यांनी मतदान केल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यातील 451 मतदारांपैकी 24 जणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. दर्यापूर येथे एक, तिवसा येथे 12 आणि अमरावती केंद्रावर 11 नगरसेवक अनुपस्थित राहिले. काँग्रेसने आपल्या 118 नगरसेवकांना मतदानापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यापैकी केवळ 24 जणांनीच पक्षाच्या भूमिकेचे पालन केल्याचे चित्र दिसून आले.मतदानाची टक्केवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 6.87 टक्के होती. दुपारी 12 वाजेपर्यंत ती 45.01 टक्क्यांवर पोहोचली. दुपारी 2 वाजता 87.80 टक्के मतदान पूर्ण झाले, तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत अंतिम मतदान 94.68 टक्क्यांवर जाऊन पोहोचले.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख जफर शेख जब्बार हे गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदानासाठी केंद्रावर पोहोचले. त्यांच्या मतदानानंतर आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके आणि यश खोडके यांनी मतदान केंद्र सोडले.तसेच काँग्रेसचे नगरसेवक विक्की वानखेडे आणि प्रशांत महल्ले हे प्रसारमाध्यमे व राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष टाळत मतदान केंद्रावर आले आणि मतदान करून तत्काळ निघून गेल्याचेही पाहायला मिळाले. विधान परिषद निवडणुकीतील या घडामोडींमुळे निकालापूर्वीच अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

धारणी - 100 टक्के

अचलपूर - 100 टक्के

मोर्शी - 100 टक्के

दर्यापूर - 98.33 टक्के

तिवसा-भातकुली - 68.42 टक्के

अमरावती - 88.42 टक्के

चांदूर रेल्वे - 100 टक्के

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande