अंबेजोगाई वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. अशोक कवडे; परळी नगर परिषदेकडून सत्कार
बीड, 18 जून (हिं.स.) : अंबेजोगाई वकील संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशोक कवडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अ

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ऍड. कवडे यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, अभ्यासू वृत्तीची आणि न्यायव्यवस्थेप्रती असलेल्या निष्ठेची पावती असल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली अंबेजोगाई वकील संघ अधिक सक्षम, गतिमान आणि समाजाभिमुख कार्य करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

सत्कार कार्यक्रमाला परळी वैजनाथ नगर परिषदेचे गटनेते वैजनाथराव सोळंके, कार्यालयीन अधीक्षक संतोषराव रोडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ॲड. अशोक कवडे यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

-------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

 rajesh pande