
सोलापूर, 18 जून (हिं.स.)।
खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका शालन शिंदे यांना पोलिस बंदोबस्तात विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी आणण्यात आले. त्यांनी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.
महापालिका सदस्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेसाठी शालन शिंदे यांना विशेष सुरक्षा व्यवस्थेत मतदान केंद्रावर आणण्यात आले होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलिस बंदोबस्तात परत नेण्यात आले.
या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान प्रक्रिया मात्र नियोजित पद्धतीने पार पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड