
छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार साथ सोडून गेल्याने ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या लोकांना तुडवले पाहिजे असे म्हणत रोष व्यक्त केला, मात्र माझे खासदार मित्र बंडू बॉस जाधव हे ठाकरे यांना सोडून गेल्याने मला दुःख झालं,ते माझे चांगले मित्र आहेत अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे म्हणाले जे झाले ते योग्य झाले नाही. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाड्यातील खासदारांना भरभरून साथ दिली एवढेच नव्हे तर त्यांना तिकीट देऊन निवडून आणले. काही नसताना खासदार केले परंतु पक्ष अडचणीत असताना उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणे योग्य झाले नाही. मराठवाड्यातील परभणी नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात शिवसेना आक्रमक असताना खासदारांनी पक्ष सोडणे दुःखदायक आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis