मान्सून लांबणीची शक्यता; पाणी काटकसरीने वापरावे - सोलापूर जिल्हाधिकारी
सोलापूर, 18 जून (हिं.स.) एल-निनोच्या प्रभावामुळे येणारा मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन येत्या काळातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले. उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने केवळ पिण
Collctor


सोलापूर, 18 जून (हिं.स.) एल-निनोच्या प्रभावामुळे येणारा मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन येत्या काळातील पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले. उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने केवळ पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात यावा, तसेच पाण्याची गळती, गैरवापर आणि थेट जलाशयातून उपसा शेतीसाठी होणे याबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित एल- निनो व टंचाईच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रवीण पाटील, अधिक्षक अभियंता उजनी धरण सकृत खांडेकर, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सपताळे, उप अभियंता सोलापूर महानगरपालिका एस. व्ही. एकबोटे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग आर्यन पवार उपस्थित होते.

जलसंपदा विभागाने लघु, मध्यम बंधारे व धरणे या जलप्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती सादर करून पाण्याचे नियोजन करावे. त्याचा आढावा पुढील बैठकीत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.जिल्ह्यातील जल प्रकल्पांबाबत सध्या उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजलप्रकल्प आहेत. यापैकी 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल, अशी माहिती देण्यात आली. तसेच उजनी धरणात सध्या 50.61 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे अधीक्षक अभियंता उजनी धरण सकृत खांडेकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande