नांदेड-बिलोली येथील मतदान केंद्राला राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडेंची भेट
नांदेड, 18 जून (हिं.स.) । नांदेड विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजुरकर यांच्या अनुषंगाने बिलोली येथील मतदान केंद्राला राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी भेट दिली. भाजपा प्रदेश उपाध्यक
Q


नांदेड, 18 जून (हिं.स.) । नांदेड विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजुरकर यांच्या अनुषंगाने बिलोली येथील मतदान केंद्राला राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी भेट दिली. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बिलोली व कुंडलवाडी येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. नांदेड विधान परिषद निवडणूक मतदान अतिशय शांततेने उत्साहात संपन्न होत आहे नांदेड जिल्ह्याच्या विविध भागात देखील महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी जाऊन आढावा घेतला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande