
छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर–जालना विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ निमित्त महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुहास शिरसाठ यांना मतदान करण्यासाठी सिल्लोड नगरपरिषदेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापती यांनी सिल्लोड तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मान्यवरांसमवेत उपस्थित राहून मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्वांगीण विकास, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि विकासाची गती कायम राखण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांना भरघोस पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
--------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis