नाशिक : कमी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांना नियोजनबद्ध शेतीचे आवाहन
नाशिक, 18 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने पावसाचे प्रमाण कमी राहणे अथवा पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जि
नाशिक : कमी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांना नियोजनबद्ध शेतीचे आवाहन


नाशिक, 18 जून (हिं.स.)। भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केल्याने पावसाचे प्रमाण कमी राहणे अथवा पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, पीक नियोजन, जलसंधारण आणि हवामानाधारित शेती व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण 6 लाख 40 हजार 550 हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड केली जाते. यामध्ये मका 2 लाख 36 हजार 239 हेक्टर, बाजरी 80 हजार 295 हेक्टर, भात 93 हजार 467 हेक्टर, मूग 19 हजार 658 हेक्टर, सोयाबीन 99 हजार 949 हेक्टर, भुईमूग 24 हजार 128 हेक्टर आणि तूर 6 हजार 347 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. याशिवाय फळबागांचे क्षेत्र 1 लक्ष हेक्टर असून यात द्राक्ष 56 हजार हेक्टर आणि डाळिंब 24 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मागील वर्षी 16 जून 2025 पर्यंत जिल्ह्यात सरासरी 226.60 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 10.09 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने यंदा सरासरीच्या 90 टक्के (±5%) पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांनी अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande