लातूर - फटाक्याच्या कारखान्याला आग, पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान, जीवितहानी नाही
लातूर, 18 जून (हिं.स.)। निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे आज सकाळी दहाच्या सुमारास एका फटाक्याच्या कारखान्यास आग लागल्याने या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करून ही राग आटोक्यात आणण्यात आली आहे. अच
फटाक्याच्या कारखान्याला आग


लातूर, 18 जून (हिं.स.)।

निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे आज सकाळी दहाच्या सुमारास एका फटाक्याच्या कारखान्यास आग लागल्याने या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करून ही राग आटोक्यात आणण्यात आली आहे. अचानक लागलेल्या या कारखान्यास आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. आज सकाळी दहाच्या सुमारास पानचिंचोली येथील फटाक्याच्या कारखान्यास अचानक आग लागली होती परंतु कामगार हे दहाच्या नंतर येत असल्याने एकही कामगार कारखान्यात नसल्याने या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. आगीचे प्रथम कारण शॉर्टसर्किट असल्याचे बोलले जात आहे. वेळीच अग्निशामक दलाच्या पाच बंबांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. जवळपास तीन तास ही आग सुरूच होती. यामध्ये किरकोळ आठ महिलांना जखमा झाल्याचे समजते आहे वेळीच सर्व कामगारांना त्या ठिकाणावरून हलवण्यात आले.

*ग्रामंचायतची कुठलीही परवानगी न घेता चालायचा कारखाना*

गेल्या अनेक दिवसापासून पानचिंचोली येथे फटाक्याचा कारखाना ग्रामपंचायतची परवानगी शिवाय सुरू होता. या अवैद्य प्रकारे सुरू असलेल्या कारखान्यास येथील ग्रामपंचायत दोन वेळा लेखी नोटीस बजावली होती व या नोटिसीला उत्तर न दिल्याने येथील ग्रामपंचायतीने पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली आहे परंतुपोलीस व इतर प्रशासनाला हाताशी धरून हा कारखाना सुरू असल्याचा येथील माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत साळुंखे यांनी सांगितले आहे.

*आमच्याकडे सर्व परवानगी आहेत*

पानचिंचोली येथे काही वर्षांपासून फटाकड्या तयार करण्याचा कारखाना सुरू आहे. यामध्ये आज सकाळी जवळपास पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र आमच्याकडे केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासन यांच्या सर्व कागदपत्रांची आम्ही पूर्तता करूनच काम करत असल्याचे यावेळी मुक्त किम सय्यद यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande