
लातूर, 18 जून (हिं.स.)। लातूर रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता मृग नक्षत्रही संपत आले तरी अनेक तालुक्यांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसारख्या प्रमुख पिकांच्या पेरण्या ठप्प झाल्या आहेत. पेरणीसाठी योग्य ओलावा नसल्याने बळीराजा आभाळाकडे आशेने पाहत आहे.
मान्सून वेळेत दाखल होऊन पेरण्या सुरू होतील, या अपेक्षेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, सरी-वरंबे यांसह मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे व खतेही खरेदी करून ठेवली आहेत. मात्र प्रत्यक्षात पाऊस न झाल्याने ही तयारी वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस ढगाळ वातावरण दिसत असले तरी पावसाचा ठावठिकाणा नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा अधिकच वाढली आहे. दि. ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरणीचा मुहूर्त हुकला आहे. पारंपरिक कृषी अनुभवानुसार मृग नक्षत्रातील पावसाला विशेष महत्त्व खरीप हंगामाच्या आशा आर्द्रावर अवलंबून अनेक शेतकरी दररोज आकाशाकडे डोळे लावून वरुणराजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. आर्द्रा नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेग येऊन हंगाम मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र पावसाचा आणखी विलंब झाल्यास पिकांची निवड, उत्पादन आणि संपूर्ण शेती अर्थकारणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या तरी चाकूर तालुक्यातील बळीराजा आभाळाकडे नजरा लावून समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
असते. मात्र यंदा या नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाचे गणित बिघडले आहे. आता दि. २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्राकडे शेतकऱ्यांच्या आशा लागल्या आहेत. आर्द्रा नक्षत्रातही पाऊस लांबला तर संपूर्ण खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. उशिरा पेरणी झाल्यास पिकांच्या वाढीवर तसेच उत्पादनावर थेट परिणाम होऊ शकतो. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis