लातूरमध्ये कीर्ती ऑइल मिलची महापालिकेला सलग मदत
लातूर, 18 जून (हिं.स.) : आगीसारख्या भीषण दुर्घटनांदरम्यान निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत कीर्ती ऑइल मिलने लातूर महानगरपालिकेला वारंवार मोलाची मदत केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला आग लागली होती. घटनेची
लातूर महानगरपालिका


लातूर, 18 जून (हिं.स.) : आगीसारख्या भीषण दुर्घटनांदरम्यान निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत कीर्ती ऑइल मिलने लातूर महानगरपालिकेला वारंवार मोलाची मदत केल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान आग भीषण स्वरूपाची असल्याचे लक्षात आले.

आगीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अतिरिक्त अग्निशमन वाहनेही पाचारण करण्यात आली. मात्र आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली. यावेळी परिसरातील कीर्ती ऑइल मिलशी संपर्क साधण्यात आला.

कीर्ती ऑइल मिलने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सलग दोन दिवस पाण्याचा पुरवठा करून अग्निशमन कार्यात महत्त्वपूर्ण मदत केली. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे सुलभ झाले.

यापूर्वीही एमआयडीसी परिसरात अशा प्रकारच्या आगीच्या घटनांमध्ये कीर्ती ऑइल मिलकडून महानगरपालिकेला पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. आपत्कालीन प्रसंगी सातत्याने दिलेल्या या सहकार्यामुळे अग्निशमन कार्यवाही अधिक प्रभावी ठरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande