कायदा व सुव्यवस्था, जनजागृती उपक्रम, नागरिक -पोलीस संवाद
बीड, 18 जून (हिं.स.)। नेकनुर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनात नेकनुर पोलिस ठाण्यात पत्रकार यांच्या समवेत नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था,, जनजागृती उपक्रम, नागरिक -पोलीस संवाद , सामाजिक सलोखा तस
अ


बीड, 18 जून (हिं.स.)।

नेकनुर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनात नेकनुर पोलिस ठाण्यात पत्रकार यांच्या समवेत नेकनुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था,, जनजागृती उपक्रम, नागरिक -पोलीस संवाद , सामाजिक सलोखा तसेच नागरिकांच्या हिताच्या विविध विषयावर संवाद साधण्यासाठी तसेच सूचना, मार्गदर्शन व सकारात्मक सहभागाची अपेक्षा व्यक्त करत बैठक बोलावली होती. पोलीस व प्रसार माध्यमे यांच्यात अधिक समन्वय निर्माण होऊन नागरिकांपर्यंत योग्य व विश्वासार्ह माहिती पोचवावी हा यामागे उद्देश होता. सर्वसामान्य माणसाला पोलिस ठाण्यात सन्मान वागणुक, तक्रारदार यांच्ये शंकानिरसन तसेच शेतकरी, सर्वसामान्य माणूस यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवुन, अवैध व्यवसाय, दहशत माजविणारांवर जरब बसविण्यात यावी आदी अपेक्षा व्यक्त करत पत्रकार बांधवांनी पोलिस प्रशासनाला सर्वैतोपरी सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande