
परभणी, 18 जून (हिं.स.) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघात अंतीम मुदतीत म्हणजे सायंकाळी 4 वाजेपर्यंत 99.79 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण 466 मतदार आहेत. त्यापैकी 465 मतदारांनी दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
परभणीतील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर एकूण 128 पैकी 128, सेलूतील मतदान केंद्रावर 59 पैकी 58, गंगाखेडातील केंद्रावर 73 पैकी 73, पाथरीतील केंद्रावर 74 पैकी 74, हिंगोलीतील केंद्रावर 58 पैकी 58, कळमनुरी केंद्रावर 23 पैकी 23 व वसमत येथील मतदान केंद्रावर 51 पैकी 51 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis