लातूरात सात चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा उलगडा
बीड जिल्ह्यातील तीन विधी संघर्षग्रस्त बालके ताब्यात, १७ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर, 18 जून (हिं.स.)। लातूर शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याच्या घटना घडत होत्या.अशा गंभीर स्व
पोलीस कारवाई


बीड जिल्ह्यातील तीन विधी संघर्षग्रस्त बालके ताब्यात, १७ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

लातूर, 18 जून (हिं.स.)।

लातूर शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याच्या घटना घडत होत्या.अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम हाती घेतली होती.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा एकाच वेळी उलगडा करत तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांबाबत माहिती संकलित करीत असताना पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जुना रेणापूर नाका ते पापविनाशी रोड परिसरात सापळा रचून संशयित अवस्थेत थांबलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी लातूर शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी आपल्या इतर साथीदारांसह नाईक चौक, अंबाजोगाई रोड, औसा रोड, बाभळगाव, एमआयडीसी परिसर तसेच शहरातील इतर भागांमध्ये अनेक चैन स्नॅचिंगच्या घटना केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून विविध गुन्ह्यांतील चोरीस गेलेले सोन्याचे मिनी गंठण, काळ्या मण्यांसह मंगळसूत्राचे भाग असा एकूण दहा तोळे नऊ ग्राम वजनाचे दागिने तसेच गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ₹१७,१०,००/- इतकी आहे.

तपासादरम्यान सदर आरोपींकडून खालील गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे :

- पोलीस स्टेशन शिवाजीनगर – २ गुन्हे

- पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण – १ गुन्हा

- पोलीस स्टेशन गांधी चौक – १ गुन्हा

- पोलीस स्टेशन एमआयडीसी – २ गुन्हे

- पोलीस स्टेशन विवेकानंद चौक – १ गुन्हा

अशा एकूण सात चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande