बीड-लातूर-धाराशिव मतदारसंघात बस्वराज पाटील यांच्या उमेदवारीस धनंजय मुंडे यांचा पाठिंबा
बीड, 18 जून (हिं.स.) : विधानपरिषदेच्या बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार बस्वराज पाटील यांनी बुधवारी नाथरा येथे माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगर परिषद स
Q


बीड, 18 जून (हिं.स.) : विधानपरिषदेच्या बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार बस्वराज पाटील यांनी बुधवारी नाथरा येथे माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगर परिषद सदस्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

भेटीदरम्यान आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करताना धनंजय मुंडे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार बस्वराज पाटील यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना न्याय देणारे आणि विकासाभिमुख नेतृत्व विधानपरिषदेत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्या एकजुटीच्या बळावर बस्वराज पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बस्वराज पाटील यांचा विजय हा विकास, समन्वय आणि जनसेवेच्या विचारांचा विजय ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande