छ. संभाजीनगर-आमदार नारायण कुचेंकडून विधान परिषदेच्या निवडणुकीचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.) : बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर–जालना विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.) : बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर–जालना विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाठ यांना मतदान करण्यासाठी बदनापूर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक जालना तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रावर उपस्थित राहिले. यावेळी उमेदवार सुहास शिरसाठ, माजी आमदार अरविंद चव्हाण, अनिल कोलते पाटील तसेच इतर मान्यवरांसमवेत उपस्थित राहून मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला भरघोस पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande