आ. विलास भुमरे यांनी घेतला मतदान प्रक्रियेचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी पैठण तहसील कार्यालय येथे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व नगरपरिषद सदस्यांनी उत्साहात मतदान केले. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभ
आ. विलास भुमरे यांनी घेतला मतदान प्रक्रियेचा आढावा


छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी पैठण तहसील कार्यालय येथे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य व नगरपरिषद सदस्यांनी उत्साहात मतदान केले. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी आमदार विलास भुमरे यांनी मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच उपस्थित मतदारांचे अभिनंदन करत मतदान हा प्रत्येकाचा अधिकार व कर्तव्य असल्याचे सांगितले. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande