तात्पुरत्या यूडीआयडी धारक दिव्यांगांना मोठा दिलासा
परभणी, 18 जून (हिं.स.)। तात्पुरते दिव्यांगत्व (टेम्पररी यूडीआयडी) प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींना विशेष सहाय्य योजनांचे लाभ सुरू ठेवण्याबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला असून, राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना मोठा दिल
तात्पुरत्या यूडीआयडी धारक दिव्यांगांना मोठा दिलासा


परभणी, 18 जून (हिं.स.)।

तात्पुरते दिव्यांगत्व (टेम्पररी यूडीआयडी) प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींना विशेष सहाय्य योजनांचे लाभ सुरू ठेवण्याबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला असून, राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव तथा हिंगोली जिल्हा प्रभारी इंजि. देवानंद हत्तीअंबीरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. यापूर्वी 27 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार केवळ कायमस्वरूपी (परमनंट) दिव्यांगत्व प्रमाणपत्रधारक व्यक्तींनाच विविध शासकीय योजनांचे लाभ देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या अनेक दिव्यांगांना योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर इंजि. देवानंद हत्तीअंबीरे यांनी राज्यातील सुमारे 3 लाख 30 हजार 314 दिव्यांग बांधवांच्या वतीने शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. विविध स्तरांवर निवेदने सादर करून तात्पुरते यूडीआयडी प्रमाणपत्रधारक दिव्यांगांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी भूमिका मांडली. या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने 17 जून 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी करून तात्पुरत्या यूडीआयडी धारक दिव्यांग व्यक्तींनाही विशेष सहाय्य योजनांचे लाभ सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शासनाच्या या निर्णयाचे राज्यभरातील विविध दिव्यांग संघटना आणि दिव्यांग बांधवांकडून स्वागत करण्यात येत असून, यामुळे हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.दिव्यांग बांधवांच्या एकजुटीचे फलित... या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना हत्तीअंबीरे म्हणाले, हे यश केवळ माझे नसून महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग बांधवांच्या एकजुटीचे आणि संघर्षाचे फलित आहे. दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी उभारलेल्या लढ्याला यश मिळाल्याचा आनंद आहे. यावेळी त्यांनी राज्याचे दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे, आमदार रोहित पवार, राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे, कान्हेकर, परभणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, दिव्यांग विभाग प्रमुख प्रदीप चौधरी तसेच डॉ. निलेश दळवे यांचे आभार व्यक्त केले. राजकीय आणि सामाजिक जीवनातील हे माझे पहिले मोठे यश असून, भविष्यातही दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठी अधिक ताकदीने लढत राहणार आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande