मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ऑनलाईन; रुग्णालयांमार्फतच थेट अर्ज होणार सादर
नंदुरबार, 18 जून, (हिं.स.) गोरगरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज आता पूर्णपणे हायटेक आणि ऑनलाईन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आण
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ऑनलाईन; रुग्णालयांमार्फतच थेट अर्ज होणार सादर


नंदुरबार, 18 जून, (हिं.स.) गोरगरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कामकाज आता पूर्णपणे हायटेक आणि ऑनलाईन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून मंत्रालय, मुंबई येथे या नवीन ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले आहे. या नव्या सुविधेमुळे आता रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही, तर रुग्णालयांमार्फतच थेट अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार धामणे यांनी कळविले आहे.

नवीन ऑनलाईन प्रणालीची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

थेट रुग्णालयातून अर्ज: रुग्णांना आता स्वतः अर्ज करण्याची गरज नाही. आवश्यक कागदपत्रे

रुग्णालयात जमा केल्यानंतर संबंधित रुग्णालयच थेट ऑनलाईन अर्ज सादर करेल.

आठ तासांत मंजुरी: अर्जाची संपूर्ण मंजुरी प्रक्रिया कार्यालयीन वेळेतील अवघ्या 8 तासांत पूर्ण

केली जाईल.

रिअल टाईम अपडेट्स: अर्जाची सद्यस्थिती रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस (SMS)

आणि लिंकद्वारे रिअल टाईममध्ये समजेल.

निधीचे वितरण: अर्जाच्या प्राथमिक मंजुरीनंतर 30 टक्के रक्कम तात्काळ, तर उर्वरित 70 टक्के रक्कम

अंतिम मंजुरीनंतर थेट वर्ग केली जाईल.

डीबीटी (DBT) द्वारे थेट निधी: मंजूर झालेली रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट

रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

पेपरलेस आणि डिजिटल पडताळणी: सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार असल्याने

कागदपत्रांची प्रत्यक्ष देवाणघेवाण टळेल. आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, शिधापत्रिका (रेशन कार्ड)

इत्यादींची तात्काळ डिजिटल पडताळणी केली जाईल.

तीन हजारहून अधिक रुग्णालयांचा समावेश: या प्रणालीमध्ये राज्यातील 3 हजारहून अधिक

सरकारी आणि संलग्न खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.

मंत्रालय वॉर रूम: निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर वॉर रूमद्वारे या संपूर्ण

प्रक्रियेवर सतत देखरेख ठेवली जाणार आहे.

रुग्णांसाठी अतिरिक्त डिजिटल सुविधा:

मोबाईल अॅप: या सुविधेच्या मोबाईल अॅपद्वारे रुग्णांना जवळील रुग्णालय, रक्तपेढी आणि

रुग्णवाहिका शोधणे सोपे होणार आहे.

बेड मॅनेजमेंट: धर्मादाय रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची माहिती रिअल टाईममध्ये उपलब्ध

असेल.

हेल्पलाईन व रुग्णमित्र सेवा: रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी 24x7 टोल फ्री क्रमांक: 18001232211

आणि व्हॉट्सअॅप सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सीएसआर व एनजीओ भागीदारी: महागड्या उपचारांचा खर्च सामायिक करण्यासाठी रुग्णालय,

सीएसआर (CSR) संस्था आणि सीएमआरएफ (CMRF) यांच्यात त्रिपक्षीय करार प्रणाली लागू

करण्यात आली असून, कॉर्पोरेट निधीद्वारे अतिरिक्त मदत मिळवून दिली जाईल.

या नवीन पोर्टलच्या माध्यमातून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ थांबणार असून उपचार

प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. या

संदर्भातील अधिक माहिती अथवा मार्गदर्शनासाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार' येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असेही वैद्यकीय अधिकारी श्री. धामणे

यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande