‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ उपक्रमात डबेवाला कामगारांनाही सामावून घ्या, मुंबई डबेवाला असोसिएशनची मागणी
मुंबई, 18 जून (हिं.स.) - मुंबई व एमएमआर रिजन परिसरात ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ ही नवीन व प्रवाशांच्या खिशाला परवडणारी टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई डबेवाला असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार प्रवीण दरेकर यांची वांद्रे येथी
निवेदन


मुंबई, 18 जून (हिं.स.) - मुंबई व एमएमआर रिजन परिसरात ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ ही नवीन व प्रवाशांच्या खिशाला परवडणारी टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई डबेवाला असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार प्रवीण दरेकर यांची वांद्रे येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी मुंबईमध्ये गेली १३५ वर्ष डबेवाला कामगार काम करतो आहे, परंतू कोरोना व लॅाकडाऊननंतर डबे पोहचवणे या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे डबेवाला कामगाराला ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ सेवेत प्राधान्य देत सामावून घेण्याची मागणी केली.

मुंबई डबेवाला असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आ. प्रवीण दरेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, ज्या डबेवाला कामगाराकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे त्या डबेवाला कामगाराला ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ सेवा योजनेत प्राधान्य द्यावे. जेणेकरून त्याला काही ना काही रोजगार मिळेल. डबेवाला कामगारांचा मुंबईतील रोजगार जरी गेला तरी ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ सेवेमुळे त्याला पुन्हा मुंबईमध्ये रोजगार मिळू शकतो. तरी एक मराठी माणूस म्हणून डबेवाला कामगारांना प्राधान्याने टॅक्सी परमिट द्यावे व योग्य व्याज दरात कर्ज उपलब्ध करून टॅक्सी मिळवून द्यावी.

यावेळी मुंबई डबेवाला असोसिएशनच्या शिष्टमंडळाला आ. प्रवीण दरेकर यांनी आश्वस्त केले कि, मी तुमच्यासोबत आहे काही काळजी करू नका. ज्यांच्या कडे वाहन परवाना आहे त्यांना आम्ही गाडी घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ. तसेच ज्यांच्याकडे वाहन परवाना नसेल तर त्याला आम्ही वाहन परवाना काढायला मदत करू. तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत माझ्याकडून केली जाईल. यावर मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी आ. दरेकर यांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande