NEET-2026 परीक्षार्थींसाठी २१ जूनला मध्य रेल्वेवर १८२० सेवा धावणार; 'मेगा ब्लॉक' नाही
मुंबई, 18 जून (हिं.स.) - NEET UG 2026 परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेने रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी कोणताही ''मेगा ब्लॉक'' न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २१ जून २०२६ रोजी रविवारचे विशेष वेळापत्रक लागू राहणार ना
NEET-2026 परीक्षार्थींसाठी २१ जूनला मध्य रेल्वेवर १८२० सेवा धावणार; 'मेगा ब्लॉक' नाही


मुंबई, 18 जून (हिं.स.) - NEET UG 2026 परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेने रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी कोणताही 'मेगा ब्लॉक' न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक २१ जून २०२६ रोजी रविवारचे विशेष वेळापत्रक लागू राहणार नाही

मध्य रेल्वे रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सर्व मार्गांवर उपनगरीय रेल्वेच्या सर्व १८२० सेवा नियमित वेळापत्रकानुसार चालविणार येणार आहे; सामान्यतः रविवारी १२०० सेवा चालवल्या जातात.

यामुळे रेल्वे सेवा सुरळीत आणि विनाअडथळा सुरू राहील आणि NEET UG 2026 परीक्षेला बसणारे मोठ्या संख्येतील उमेदवार व त्यांचे पालक कोणत्याही गैरसोयीशिवाय वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande