
नांदेड, 18 जून (हिं.स.)। नांदेड येथील मतदान केंद्रावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित राहून पाहणी केली आणि मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर हे मैदानात आहेत. नांदेडच्या विकासाचा वारसा समर्थपणे पुढे नेण्यासाठी आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान कराण्याचं तसंच विकासकामांवर विश्वास ठेवत महायुतीला साथ देण्याचं आवाहन केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis