नंदुरबार प्रकल्पातील 7 आश्रमशाळांमध्ये 11 वी व 12 वीचे वर्ग सुरू
नंदुरबार, 18 जून (हिं.स.) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या 7 शासकीय आश्रमशाळांमध्ये इयत्ता 11 वी आणि 12 वीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या शाळांमध्ये प्रवेश
नंदुरबार प्रकल्पातील 7 आश्रमशाळांमध्ये 11 वी व 12 वीचे वर्ग सुरू


नंदुरबार, 18 जून (हिं.स.) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या 7 शासकीय आश्रमशाळांमध्ये इयत्ता 11

वी आणि 12 वीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष

2026-27 पासून या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा

लाभ घेऊन तात्काळ प्रवेश घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ.

चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

या निर्णयामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी त्यांच्या

स्वतःच्या परिसरातच उपलब्ध होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे.

उच्च माध्यमिक वर्ग सुरू झालेल्या शाळांमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा निजामपूर, बोरचक,

नावली, खडकी, खेकडा,बंधारे व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार या आश्रमशाळांचा

समावेश आहे.

प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत खालील विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत:

मोफत शिक्षण, निवास आणि भोजन व्यवस्था

अनुभवी शिक्षकांकडून अध्यापन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

डीबीटी (DBT) योजनेचा लाभ

सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आणि आधुनिक संगणक प्रयोगशाळा

शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम

इच्छुक उमेदवारांनी प्रवेशासाठी अर्ज करताना इयत्ता 10 वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र, शाळा

सोडल्याचा दाखला (T.C.), जात प्रमाणपत्र, आधार कार्ड प्रत, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. आदि कागदपत्रे

सोबत जोडणे आवश्यक आहे.

प्रवेश घेण्यास इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संबंधित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांशी

त्वरित संपर्क साधावा असेही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. पवार यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande