काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेवर निलेश विश्वकर्मा यांचा हल्लाबोल
अमरावती, 18 जून (हिं.स.)। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरू असताना काँग्रेसच्या तठस्थ भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेसचे उमेदवार हर्षजी
काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेवर निलेश विश्वकर्मा यांचा हल्लाबोल


अमरावती, 18 जून (हिं.स.)। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरू असताना काँग्रेसच्या तठस्थ भूमिकेवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख निवडणुकीत प्रभावीपणे दिसत नसल्याचा आरोप करत काँग्रेसनं आपल्या नगरसेवकांना तठस्थ राहण्याचे निर्देश दिल्याची टीका निलेश विश्वकर्मा यांनी केली. एकीकडं काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र अमरावती जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांना पक्षाच्या वाढीची कोणतीही चिंता नाही असं त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होतंय असं देखील निलेश विश्वकर्मा यांनी म्हटलंय.

अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्माची तिरंगी लढत असली तरी प्रत्यक्षात प्रवीण पोटे यांच्या विरोधात थेट संघर्ष आपलाच असल्याचा दावा निलेश विश्वकर्मा यांनी केला. काँग्रेसचा उमेदवार प्रचारात प्रभावीपणे दिसत नसल्यानं काँग्रेसने समविचारी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला असं निलेश विश्वकर्मा म्हणाले. मात्र तसं न करता पक्षानं तटस्थ

राहण्याची भूमिका घेतल्यानं भाजपा विरोधी मतांचा नुकसान झाल्याचा आरोप देखील विश्वकर्मा यांनी केलाय.काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षांना लोकशाही मूल्यांची जपणूक केली आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्ते आणि नगरसेवकांना मतदानापासून दूर राहण्याचा संदेश देणं ही लोकशाहीसाठी दुर्दैवी बाब आहे असं निलेश विश्वकर्मा म्हणाले. एखाद्या निवडणुकीत स्वतःचा उमेदवार प्रभावीपणे मैदानात नसल्यास समविचारी पक्षाला पाठिंबा देणं किंवा स्वतंत्र भूमिका स्पष्ट करणं अपेक्षित असतं. मात्र मतदानात करू नका अशी भूमिका घेणं योग्य नाही असं निलेश विश्वकर्मा म्हणाले.

काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी मतदान केल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश विश्वकर्मा यांनी त्यांचा स्वागत केलं. ज्या चार-पाच काँग्रेस नगरसेवकांनी मतदान केलं त्यांनी संविधानाने दिलेला अधिकार बजावला आहे. मतदान करणं हा त्यांचा लोकशाही हक्क आहे आणि त्यांनी तो वापरला असं निलेश विश्वकर्मा म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला दुजोरा :

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेच्या संदर्भात निलेश विश्वकर्मा म्हणाले की, निवडणुकीत मतांची गरज असताना काँग्रेस सर्व समाज घटक आणि समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाषा करते. मात्र प्रत्यक्षात पाठिंबा देण्याची वेळ आली की ते मागे हटतात. गत काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत होती. मतदानाच्या दिवशी अचानक तटस्थतेचा निर्णय जाहीर करण्यात आला. हा निर्णय भाजपा विरोधी मतदारांच्या अपेक्षांना धक्का देणारा असल्याचा आरोप देखील निलेश विश्वकर्मा यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande