पंढरपुरात विठ्ठल मूर्ती लेपनावरून वाद; मंदिर महासंघाचा मंदिर समितीला इशारा
सोलापूर, 18 जून (हिं.स.)।स्वयंभू श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, त्याऐवजी नैसर्गिक पद्धतीने संवर्धन करावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनी
Vithal


सोलापूर, 18 जून (हिं.स.)।स्वयंभू श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, त्याऐवजी नैसर्गिक पद्धतीने संवर्धन करावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिला.यापूर्वी वारकरी पाईक संघानेही या प्रक्रियेला विरोध दर्शविला होता. दरम्यान, २२ ते २४ जून या कालावधीत मूर्ती जतन व संवर्धनासाठी रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून, त्यासाठी दोन दिवस मंदिर दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज झाल्यामुळे तिच्या जतनासाठी रासायनिक लेपन करण्याचा सल्ला छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाने दिला होता. त्यानुसार मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या चार वेळा मूर्तीवर रासायनिक लेपन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही मूर्तीची झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे.अलीकडे मूर्ती तज्ज्ञांनी पाहणी करून 'व्रजलेप' करण्याचा पर्याय सुचविला होता. तरीही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसारच संवर्धनाचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, या निर्णयाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शवित तत्काळ निर्णय मागे घेण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande