पाऊस गायब, खरीप हंगाम टांगणीला एल निनोचा परिणाम; माजलगाव धरणात २१ टक्केच साठा
बीड, 18 जून (हिं.स.)। जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यासह परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. माजलगाव धरणातील पाणीसाठाही अत्यल्प पातळीवर आला आहे. एकीकडे पावसाने ओढ दिली, तर दुसरीकडे एल निनोच्या प्र
पाऊस गायब, खरीप हंगाम टांगणीला एल निनोचा परिणाम; माजलगाव धरणात २१ टक्केच साठा


बीड, 18 जून (हिं.स.)।

जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यासह परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. माजलगाव धरणातील पाणीसाठाही अत्यल्प पातळीवर आला आहे. एकीकडे पावसाने ओढ दिली, तर दुसरीकडे एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सूनचा वेग मंदावल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळू लागल्या आहेत. यावर्षी वेळेवर पाऊस पडेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि मशागतीची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, पावसाअभावी शेतात पेरणीची कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणतः मोठ्या प्रमाणात पेरण्या पूर्ण होत असतात. यंदा मात्र अनेक ठिकाणी शेतजमिनी कोरड्याच असून, पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. माजलगाव धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता आहे. धरणाच्या जलसाठ्यावर अवलंबून असलेल्या

एल-निनोच्या प्रभावामुळे मॉन्सूनचे आगमन विस्कळित होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात खंड पडून खरीप हंगामावर परिणाम होऊ शकतो. वेळेवर पाऊस न झाल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांच्या पेरण्या आणखी लांबण्याची शक्यता आहे.

अनेक गावांमध्ये भविष्यात पाणीटंचाईची भीती निर्माण होण्याची आहे. लवुळसह अनेक गावात मागील सात दिवसांपासुन दोन तीन दिवस सारखा पाउस झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी या पावसावर खरिपातील कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांची लागवड केली परंतु आता पावसाची उघडीप झाल्याने मात्र या शेतक-यांवर आता पुन्हा पेरणी करण्याचे संकट ओढावले असुन त्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande