महावितरण नागपूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी राजेश नाईक यांची नियुक्ती
नागपूर १८ जून (हिं.स.) :महावितरणच्या नागपूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी राजेश नाईक यांनी गुरुवारी (दि. १८) पदभार स्वीकारला. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मुंबई येथील सांघिक कार्यालयात बदली झाल्यानंतर नाईक यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आ
राजेश नाईक महावितरणचे मुख्य अभियंता


नागपूर १८ जून (हिं.स.) :महावितरणच्या नागपूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी राजेश नाईक यांनी गुरुवारी (दि. १८) पदभार स्वीकारला. मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मुंबई येथील सांघिक कार्यालयात बदली झाल्यानंतर नाईक यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्यावर विशेष भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

राजेश नाईक यांनी आपल्या महावितरणमधील कारकीर्दीची सुरुवात अकोला परिमंडलात कनिष्ठ अभियंता म्हणून केली. गेल्या २९ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता अशा विविध पदांवर काम करत महत्त्वपूर्ण अनुभव मिळवला आहे.

त्यांनी नागपूर शहरातील शंकरनगर उपविभाग, अधीक्षक अभियंता (वाशी), अधीक्षक अभियंता (भंडारा) आणि अधीक्षक अभियंता (नागपूर ग्रामीण) यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अकोला परिमंडलात मुख्य अभियंता म्हणून काम करण्याचा अनुभवही त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत मोलाचा ठरला आहे.वीज ही केवळ सुविधा नसून मूलभूत गरज असल्याचे नमूद करत नाईक यांनी परिमंडलातील पायाभूत विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागनिहाय आढावा बैठका घेत परिमंडलाच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.

नवीन मुख्य अभियंत्यांनी महावितरणच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे तसेच शंभर टक्के वीजबिल वसुलीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे नागपूर परिमंडलाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande