सोलापूरात विधान परिषद निवडणुकीत 99.71 टक्के मतदान; एकमेव नगरसेवक गैरहजर
सोलापूर, 18 जून (हिं.स.)। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 345 मतदारांपैकी 344 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, तर परदेश दौऱ्यावर असल्याने एका नगरसेवकाल
Vidhan Parishad


सोलापूर, 18 जून (हिं.स.)।

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 345 मतदारांपैकी 344 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, तर परदेश दौऱ्यावर असल्याने एका नगरसेवकाला मतदान करता आले नाही.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला. त्यामुळे या निवडणुकीत तब्बल 99.71 टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदान प्रक्रिया संपूर्णपणे शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सुरळीत वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे ही निवडणूक विशेष ठरल्याचेही बोलले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande