सिल्लोडमध्ये प्रसूतीची वेळ जवळ, तरीही बजावला मतदानाचा हक्क
रुग्णवाहिकेतून येत नगरसेविका स्नेहल शिनगारे यांचे मतदान छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)। लोकशाही प्रक्रियेप्रती असलेली बांधिलकी दाखवत सिल्लोड नगर परिषदेच्या नगरसेविका स्नेहल स्वप्नील शिनगारे यांनी प्रसूतीची वेळ जवळ आलेली असतानाही मतदानाचा हक्क
सिल्लोडमध्ये प्रसूतीची वेळ जवळ, तरीही बजावला मतदानाचा हक्क


रुग्णवाहिकेतून येत नगरसेविका स्नेहल शिनगारे यांचे मतदान

छत्रपती संभाजीनगर, 18 जून (हिं.स.)।

लोकशाही प्रक्रियेप्रती असलेली बांधिलकी दाखवत सिल्लोड नगर परिषदेच्या नगरसेविका स्नेहल स्वप्नील शिनगारे यांनी प्रसूतीची वेळ जवळ आलेली असतानाही मतदानाचा हक्क बजावला. प्रकृतीची विशेष काळजी घेण्याची गरज असतानाही त्या रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर दाखल झाल्या आणि त्यांनी आपले मतदान केले. त्यांच्या या कृतीचे उपस्थित मतदार, अधिकारी आणि नागरिकांनी कौतुक केले. लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे मतदानाबाबत जनजागृतीचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande