लातूरात विप निवडणुकीसाठी नगरसेविका संगीता मिरचे यांनी केले पहिले मतदान
लातूर, 18 जून (हिं.स.)। लातूर, बीड आणि धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावत आहे
स्थानिक स्वराज्य संस्था


लातूर, 18 जून (हिं.स.)।

लातूर, बीड आणि धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

लातूर महानगरपालिकेच्या नगरसेविका संगीता सतीश मिरचे यांनी सर्वप्रथम मतदान करून मतदान प्रक्रियेचा शुभारंभ केला. मतदान केंद्रावर त्यांनी सकाळी उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून आवश्यक सुविधा व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडत आहे. मतदारसंघातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि इतर पात्र मतदार मतदान करत असतात

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवारांकडून मतदानावर बारकाईने लक्ष ठेवले जात असून या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande