सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला हिरवा कंदील
सोलापूर, 18 जून (हिं.स.)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सोलापूरकरांची तब्बल ६५
सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला हिरवा कंदील


सोलापूर, 18 जून (हिं.स.)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सोलापूरकरांची तब्बल ६५ वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरू होणार नाही. कारण, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) कडे मान्यतेसाठी अर्ज करण्याची मुदत शासन निर्णय होण्यापूर्वीच संपली आहे. त्यामुळे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि परवडणारे अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूरमधील शांती चौक (अक्कलकोट रोड) परिसरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या जागेत सुरू करण्यात येणार आहे.महाविद्यालयाच्या कामकाजासाठी टप्प्याटप्प्याने ३९ नियमित शिक्षक पदे आणि ३८ शिक्षकेतर पदे निर्माण केली जाणार आहेत. शिक्षकेतर पदांपैकी २२ पदे नियमित तर १६ पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande