सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली
सोलापूर, 18 जून (हिं.स.)सोलापूर महानगरपालिकेतील कर निर्धारक व संकलन अधिकारी (सह आयुक्त, गट-अ) आशिष लोकरे यांची प्रशासकीय कारणास्तव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संकलन अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.शासनाने सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने ही
smc


सोलापूर, 18 जून (हिं.स.)सोलापूर महानगरपालिकेतील कर निर्धारक व संकलन अधिकारी (सह आयुक्त, गट-अ) आशिष लोकरे यांची प्रशासकीय कारणास्तव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संकलन अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.शासनाने सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने ही बदली करत लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त पदावर नियुक्ती केली आहे.

सध्या ते सोलापूर महानगरपालिकेत कर निर्धारक व संकलन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शासनाच्या आदेशानुसार लोकरे यांना १७ जून २०२६ रोजी (मध्यान्हानंतर) त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार असून, १८ जून रोजी नव्या पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रुजू झाल्यानंतर त्याचा अनुपालन अहवाल तात्काळ शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा आदेश जारी करण्यात आला असून, शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande